डिजिटल मार्केटिंग ते पण मराठीतून!

नमस्कार, मी पुष्कर उज्जैनकर ‘डिजिटली युवर्स’ च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘Digiशाळा’ मध्ये मी तुमचं स्वागत करतो. ह्या वयात देखील तुमची शिकण्याची जिद्द आणि त्यासाठी तुम्ही परत एकदा शाळेत जाण्याचा विचार केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. 🙂
Digiशाळेत तुम्हाला शिकवले जाईल डिजिटल मार्केटिंग ते पण मराठीतून!
तर मराठीतूनच का?
तर तुम्हाला समजायला ते सोपं जावं आणि तुम्ही त्या त्या स्किल्स मध्ये एक्स्पर्ट व्हावं म्हणून हा कोर्स आपण मराठीतून बनवला आहे! आपल्या मातृभाषेतून शिकणं आपल्याला कधीही सोपंच जातं.

तुमच्या माझ्यासारखे बरेच जण मराठी मिडीयम मध्ये शिकलेले आणि छोट्या गावातून आलेले आहेत. तर तुम्हाला ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर ठेवण्यासाठी Digiशाळेचा हा उपक्रम.
ह्या कोर्स चा content english मधूनच असेल पण तुम्हाला समजावलं मराठीतूनच जाईल. कोर्स चा content english ठेवण्याचे कारण म्हणजे हे सगळं शिकल्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा कुठल्या मोठ्या कंपनीत किंवा तुमच्या कंपनीसाठी ह्या स्किल्स Practically Implement कराल तेव्हा तुम्हाला ह्या स्किल्स इंग्लिश मधूनच Implement कराव्या लागतील. हा कोर्स मराठीतून शिकवल्यामुळे तुम्हाला ते ज्ञान पटकन वापरता येईल.
तर हा कोर्स शिकवणारा मी कोण हे पटकन आपण जाणून घेऊया म्हणजे तुम्ही नक्की कोणाकडून शिकणार आहात त्याबाबतीत तुम्ही निर्धास्त व्हाल!

सध्या आपण सगळीकडेच डिजिटल मार्केटिंग हा शब्द ऐकत आहोत. अलीकडच्या काळात हा शब्द अतिशय trending झाला आहे.
डिजिटल मार्केटिंग हे कौशल्य ह्या काळात अतिशय वेगाने विकसित होत आहे
आणि इंटरनेटचा वापरही खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांनी आपले इंटरनेटचे दर जसे कमी केले तसा ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल बनवणाऱ्यांनी देखील मोबाईल स्वस्तात उपलब्ध करून दिले. त्यामुळे घराघरात आपल्याला इंटरनेट वापरताना लोक दिसतात. २जी, ३जी, ४जी कडून आता आपण ५जी कडे चाललो आहोत. म्हणजे तुम्हीच विचार करा, की येणारा काळ हा किती फास्ट आणि विकसित असेल! ह्या काळात आपल्याला आपल्या शिक्षणाच्या दृष्टीने, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागे राहून मुळीच चालणार नाही आणि तुम्हाला डिजिटल मार्केटर म्हणून इंटरनेटवर येणाऱ्या व्यवसायांना किंवा इंटरनेटवर येऊ इच्छिणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन द्यावे लागेल.
आपण सध्या पहात असलेल्या सर्व ऑनलाइन जाहिराती, आपण वाचत असलेली सगळी माहिती आणि आपण ऑनलाइन पाहत असलेल्या ईमेजेस ह्या डिजिटल मार्केटरच्याच कार्याचा एक भाग आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

 • आपण एखादे उत्पादन किंवा सेवेचा ऑनलाइन प्रचार करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धती आणि तंत्रे.
 • पारंपरिक मार्केटिंगप्रमाणेच ग्राहकांना आकर्षित करणे हेच डिजिटल मार्केटिंगचे देखील मुख्य लक्ष्य आहे.
 • डिजिटल मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ईमेल मार्केटिंग इत्यादींसह बरेच विभाग आहेत.
 • काळानुसार डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअरच्या संधी कोणकोणत्या ?

 1. एसईओ मॅनेजर
 2. पीपीसी मॅनेजर
 3. कन्टेन्ट मार्केटिंग मॅनेजर
 4. सोशल मीडिया मॅनेजर
 5. ऍफिलिएट मार्केटिंग
 6. ग्राफिक डिझायनर
 7. वेबसाइट डेव्हलपर, इत्यादी.

डिजिटल विक्रेत्यांसाठी वाढती मागणी

 • मार्केटिंग हायरिंग ट्रेंडच्या अहवालानुसार सुमारे ६९% कंपन्या मार्केटिंगच्या नवनवीन लोकांना संधी देणार आहेत.
 • अहवालात असेही आहे, की डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांच्या पुरवठा आणि मागणीमध्ये बरीच तफावत आहे. मागणी सुमारे 59% आहे, परंतु पुरवठा केवळ 19% आहे.
 • याचा अर्थ कंपन्या डिजिटल मार्केटर घेण्यास जास्त उत्सुक आहेत.
 • मागणी असलेली कौशल्ये शिकणे कधीही वाया जात नाही.
 • याचाच अर्थ असा आहे, की आपण जास्त मागणी असलेले कौशल्य शिकल्यानंतर अधिक सुरक्षिततेसह चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळवू शकतो.

ग्रेट ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स

 • डिजिटल इकॉनॉमी ऑफलाइन इकॉनॉमीपेक्षा 10x वेगाने वाढत आहे.
 • इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म किती फायदेशीर आहेत हे कंपन्यांना माहीत आहे.
 • डिजिटल मार्केटिंग त्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवते, त्यांचा व्यवसाय अधिक प्रमाणात वाढवून देण्यास मदत करते आणि अधिक कमाई करून देते.
 • प्रशिक्षित डिजिटल मार्केटिंगच्या लोकांशिवाय ते ही कामे करू शकत नाहीत. म्हणूनच पुढे या कौशल्यांची मागणी वाढतच जाणार आहे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर निवडण्याची कारणे

 • डिजिटल मार्केटरसाठी वाढती मागणी
 • ग्रेट ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स
 • आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा किंवा आहे त्याचा प्रचार करा. किंवा तुम्ही ज्या कंपनीत कामाला आहात त्या कंपनीचे प्रमोशन करून
  चांगले वेतन मिळवू शकता.
 • डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर सुरू करणे सोपे आहे. ह्यासाठी कुठल्याही डिग्रीची किंवा एखाद्या विशिष्ट स्किलची आवश्यकता नाही. कोणीही, अगदी कोणीही हा कोर्स करू शकतो. ह्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे कॉम्पुटर. कॉम्प्युटर नसेल तर मोबाईलही चालेल आणि इंटरनेट अतिशय महत्त्वाचे.
 • डिजिटल मार्केटिंग हे एक असे क्रिएटिव्ह फील्ड आहे ज्यात तुम्हाला उपलब्ध असलेली सगळे माध्यमे वापरून फक्त विकासाकडे कडे लक्ष द्यायचे आहेत.

हे कोण करू शकते?

 • विद्यार्थी
 • मार्केटिंग प्रोफेशनल्स
 • सेल्स प्रोफेशनल्स
 • व्यवसाय मालक
 • लघुउद्योग
 • गृहोद्योग
 • Entrepreneurs
 • कोणीही
 • माझं तर असं प्रांजळ मत आहे, की अगदी १०वी पास झालेला मुलगा/मुलगी देखील ह्या कार्यशाळेत नोंदणी करू शकतो.
Digiशाळा Course Syllabus

Scan this QR Code to make the Payment for the Course!